रिलायन्स जिओ आणि वोडाफोन-आयडिया (Vi) यांच्यात बेस्ट प्लॅन आणि फायद्यांबाबत जोरदार स्पर्धा आहे. एकीकडे, रिलायन्स जिओ आपल्या प्लॅनमध्ये युजर्सना अमर्यादित 5G डेटा देत आहे. दुसरीकडे, Vodafone-Idea देखील त्यांच्या युजर्सना मोठ्या अतिरिक्त फायद्यांसह योजना ऑफर करत आहे. दोन्ही कंपन्यांच्या सारख्याच किंमतींच्या प्लॅन आहेत. ६६६ रुपयांचा प्लॅन यापैकी एक आहे. या प्लॅनमध्ये दोन्ही कंपन्या युजर्सना सर्वोत्तम फायदे देत आहेत. तर या दोन प्लॅनपैकी कोणती योजना तुमच्यासाठी सर्वोत्तम आहे ते आपण सविस्तरपणे पाहू.
• Jio चा 699 रुपयांचा प्लॅन
जिओचा हा प्लॅन ८४ दिवसांच्या वैधतेसह येतो. या प्लॅनमध्ये तुम्हाला इंटरनेट वापरण्यासाठी दररोज 1.5 GB डेटा मिळेल. कंपनी या प्लॅनसह पात्र युजर्सना अमर्यादित 5G डेटा देखील देत आहे. दररोज 100 मोफत SMS सह या प्लॅनमध्ये तुम्हाला देशभरातील सर्व नेटवर्कसाठी अमर्यादित कॉलिंग देखील मिळेल. या प्लॅनमध्ये Jio TV आणि Jio Cinema मध्ये मोफत एन्ट्री मिळते.
• vi चा 666 रुपयांचा प्लॅन
अतिरिक्त फायद्यांबद्दल बोलायचे झाल्यास, हा प्लॅन Binge All Night Benefits सह येतो. यामध्ये युजरला मध्यरात्री 12 ते सकाळी 6 वाजेपर्यंत अनलिमिटेड डेटा मिळतो. याशिवाय, प्लॅनमध्ये वीकेंड डेटा रोलओव्हर आणि डेटा डिलाईट्स देखील दिले जात आहेत. Data Delights मध्ये कंपनी दर महिन्याला 2 GB पर्यंत बॅकअप डेटा प्रदान करते. हा प्लॅन Vi movies आणि TV अँपचे मोफत सबस्क्रिप्शन देखील देत आहे.