Vivo T2 Pro या फोन ची विक्री आज संध्याकाळी 7 पासू न सुरु होत आहे. हा फोन सेलमध्ये तुम्हाला अनेक ऑफर्स कमी किमतीत विकत घेता येईल. जर तुम्ही देखील नवीन फोन घेण्याचा विचार करत असाल आणि तुम्ही देखील Vivo T2 Pro या फोनच्या प्रतीक्षेत असाल तर चला तर मग जाणून घेऊया या फोनच्या किंमत फीचर्स आणि ऑफर्स बद्दल.
Vivo T2 Pro भारतात झाला लॉन्च: Vivo ने भारतात त्यांचा T2 Pro हा स्मार्टफोन लॉन्च केला आहे. कंपनीने कमी किंमत आणि दमदार फीचर्ससह हा फोन लॉन्च केला आहे. कंपनीने हा फोन अगदी कमी किंमत आणि उत्तम फीचर्ससह हा स्मार्टफोन लॉन्च केला आहे. Vivo चा हा 5G स्मार्टफोन 66W फास्ट चार्जिंग सपोर्ट सह येतो , उत्तम कॅमेरा आणि पॉवरफुल बॅटरी देखिल यात तुम्हाला मिळते.
Vivo T2 Pro: किंमत किती आणि ऑफर्स
Vivo T2 Pro हा स्मार्टफोन तुम्हाला ८ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज व्हेरिएंट २६,९९९ रुपयांच्या ऐवजी २३,९९९ रुपयांमध्ये विकत घेता येणार आहे तसेच फोनचा ८ जीबी रॅम आणि २५६ जीबी स्टोरेज व्हेरिएंट २७,९९९ रुपयांच्या ऐवजी २४,९९९ रुपयांमध्ये तुम्हाला विकत घेता येणार. कारण यावर तुम्हाला ३,००० रुपयांचा फ्लॅट डिस्काउंट उपलब्ध झाला आहे. हा फोन आज संध्यकाळी ७ वाजल्यापासून Vivo India च्या ई-स्टोर किंवा फ्लिपकार्टसह काही निवडक रिटेल स्टोर्स वरून तुम्हाला विकत घेता येणार आहे. हा फोन न्यू मून ब्लॅक आणि ड्युन गोल्ड या दोन कलर यामध्ये प्रामुख्याने तुम्हाला मिळणार आहे.
Vivo T2 Pro चे फीचर्स
कंपनीने Vivo T2 Pro हा स्मार्टफोन 8 GB रॅम आणि 128GB/256GB स्टोरेजसह हा स्मार्टफोन लॉन्च केला आहे. या फोनमध्ये तुम्हाला 6.78 इंच फुल एचडी प्लस डिस्प्ले मिळतो. ज्याचा रिफ्रेश दर 120 हर्ट्ज एवढा आहे. हा फोन ऑक्टा कोअर डायमेन्सिटी 7200 प्रोसेसरसह येतो जो Android 13 ऑपरेटिंग सिस्टमवर काम करतो.
Vivo T2 Pro कॅमेरा
या स्मार्टफोनमध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे, ज्यामध्ये 2MP कॅमेरा सोबत 64MP चा प्राथमिक कॅमेरा आहे. तसेच यात सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी तुम्हाला 16MP फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. या Vivo फोनमध्ये 4600 mAh ची पॉवरफुल बॅटरी आहे. ही बॅटरी 66W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.
मित्रांनो या आर्टिकल मध्ये दिलेली माहिती तुम्हाला कशी वाटली ते नक्की सांगा आणि अशाच माहितीसाठी आपल्या Tec Marathi ला फॉलो नक्की करत रहा.