नमस्कार मित्रांनो जर तुम्ही तुमच्यासाठी एक बेस्ट 5G स्मार्टफोन घ्यायचा विचार करत असाल तर या आर्टिकल मध्ये खास तुमच्यासाठी 15 हजारापेक्षा कमी किंमत असलेले बेस्ट 5G स्मार्टफोनची यादी घेऊन आलो आहोत. मित्रांनो याअगोदर सुद्धा आम्ही तुमच्यासाठी बेस्ट स्मार्टफोन अंडर 10k ची यादी घेऊन आलो होतो, त्यानंतर बऱ्याच जणांच्या म्हणण्यानुसार यावेळेस आम्ही तुमच्यासाठी बेस्ट 5G स्मार्टफोन घेऊन आलो आहोत. या लिस्टमध्ये तुम्हाला लेटेस्ट लॉन्च झालेले 5G फोन पाहायला मिळतील. आणि या सर्व मोबाईल्सची किंमत 15 हजारापेक्षा कमी आहे. चला तर पाहूया सविस्तर…
• Lava Blaze 5G
मित्रांनो हा लावा ने त्यांचा नुकताच लॉन्च केलेला 5G स्मार्टफोन आहे. यामध्ये 6.51 इंच HD+IPS (720×1600) डिस्प्ले दिला आहे, ज्याचा रिफ्रेश रेट 90 Hz एवढा आहे. हा फोन Android 12 वर रन करतो. या फोनमध्ये Media Tek Dimensity 700 प्रोसेसर देण्यात आला आहे. यामध्ये 3GB वरच्युअल रॅमचा सपोर्ट देण्यात आला आहे. हा फोन ग्लास ग्रीन आणि ग्लास ब्लू या कलर ऑपशन मध्ये देण्यात आला आहे. Lava Blaze 5G मध्ये 50MP चा प्रायमरी कॅमेरा दिला गेला आहे. या सोबतच 8MP चा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. यामध्ये 5000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. आणि USB C OTG चा सपोर्ट देण्यात आला आहे. आणि या स्मार्टफोनची किंमत फक्त 9,999 रुपये एवढी आहे.
Link : https://amzn.to/40DQrJx
• Redmi Note 10T 5G
रेडमी नोट 10T 5G या वेळीचा भारतीय बाजारातील सर्वात स्वस्त 5G स्मार्टफोन आहे. हा स्मार्टफोन फक्त 11,999 रुपयांपासून सुरुवाती किंमतीत मिळत आहे. यामध्ये 4GB रॅम सोबत परफॉर्मन्स साठी Media Tek Dimensity 700 चिपसेट मिळतो. हा स्मार्टफोन 6.5 इंच लार्ज डिस्प्ले सोबत येतो. जो 90Hz रिफ्रेश रेट वर काम करते. फोटोग्राफीसाठी फोनच्या बॅक पॅनलवर 48MP + 2MP + 2MP ट्रिपल रिअर कॅमेरा दिला गेला आहे. तथा सेल्फीसाठी 8MP फ्रंट कॅमेरा दिला आहे. पावर बॅकअपसाठी Redmi Note 10T 5G फोनमध्ये 5000 mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. आणि याची किंमत फक्त 11,999 ₹ एवढी आहे.
3. Poco M4 5G
Poco M4 5G या स्मार्टफोनची सुरुवाती किंमत 11,999 रुपये एवढी आहे. हा स्मार्टफोन फ्लिपकार्ट आणि इतर शॉपिंग साईट्स वर उपलब्ध आहे. स्पेसिफिकेश वर बोलायचं झालं तर हा फोन 4GB रॅम सोबत 64GB स्टोरेज ला सपोर्ट करतो. ज्यामध्ये प्रोसेसिंग साठी Media Tek Dimensity 700 चिपसेट देण्यात आला आहे. या स्मार्टफोमध्ये 6.58 इंच एवढी फुल HD + डिस्प्ले देण्यात आला आहे. तसेच फोटोग्राफीकरिता 50MP + 2MP चा ड्युअल रिअर कॅमेरा दिला आहे त्यासोबतच सेल्फीसाठी 2MP चा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. पावर बॅकअप साठी या मोबाईलमध्ये 5000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे.
• Samsung Galaxy M14 5G
Samsung Galaxy M14 5G स्मार्टफोनची 4GB रॅम व्हेरियंट ची किंमत 13,490 रुपये एवढी तर 6GB व्हेरियंट ची किंमत 14,490 रुपये आहे. दोन्ही मॉडेल 128GB सोबत येतात. Samsung Galaxy M14 5G 6.6 full HD+ डिस्प्ले सोबत लॉन्च करण्यात आला आहे. ज्यामध्ये 90HZ रिफ्रेश रेट चा सपोर्ट मिळतो. प्रोसेसिंग साठी यामध्ये 1330 ऑक्टा प्रोसेसर देण्यात आला. जो 5 nm फॅब्रिकेशन वर तयार झाला आहे. या स्मार्टफोनमध्ये बॅक पॅनल वर 50MP रिअर कॅमेरा सेटअप तथा 13MP सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. पावर बॅकअप साठी यामध्ये 6000mAh ची मोठी बॅटरी देण्यात आली आहे. ज्यामध्ये 25 हित फास्ट चार्जिंगचा सपोर्ट मिळतो.
Link : https://amzn.to/41VxwLf
• IQOO Z6 5G
IQOO Z6 5G या स्मार्टफोनची किंमत 4 GB + 128 GB स्टोरेज सोबत 13,999 रुपये इतकी आहे. या स्मार्टफोनमध्ये 6.58 इंची मोठा डिस्प्ले स्क्रीन देण्यात आली जो 120 hz रिफ्रेश रेट वरती काम करतो. फोटोग्राफीसाठी यामध्ये 50MP + 2MP + 2MP ट्रिपल रिअर कॅमेरा आणि सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 16MP चा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. या स्मार्टफोनमध्ये 5000 mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. ज्याची किंमत 14,999 रुपये इतकी आहे..
Link : https://amzn.to/3NbSfWR
मित्रांनो माहिती आवडली असल्यास लाईक करा आणि अशाच इतर टेक्निकल माहितीसाठी आपल्या टेक मराठी पेजला फॉलो नक्की करा.
धन्यवाद…