समजा तुम्ही कुणालातरी पैसे ट्रान्सफर करताय आणि अशातच तुमच्याकडून ते पैसे दुसऱ्या अकाउंट मध्ये ट्रान्सफर झाले तर आता आपले पैसे गेले असं म्हणत रडत बसण्याची आणि मनस्ताप करण्याची काहीही गरज नाहीय कारण ते पैसे आता तुम्ही परत मिळवू शकता. त्यासाठीच्या काही टिप्स आपण पुढे पाहूया…
पुढील प्रोसेस स्टेप बाय स्टेप करा
- यासाठी तुम्हाला npci.org.in ही वेबसाईट ओपन करायची आहे. ही सरकारची यूपीआय साठीची ऑफिसिअल वेबसाईट आहे. साईट ओपन झाल्यावर तुम्हाला उजव्या बाजूला असलेल्या गेट इन टच वर क्लिक करायचं आहे मग यूपीआय कंप्लेंट हे सेलेक्ट करा, खाली स्क्रोल केल्यावर तुम्हाला पहिलेच ऑपशन दिसेल ते ट्रान्झॅक्शनचे ते उघडलं की त्यावर दुसऱ्याच नंबरला येते ते issue त्यानंतर तुम्हाला issue टाईप निवडायचा आहे त्यामध्ये तिसऱ्या नंबर ला असलेले ऑप्शन म्हणजेच incorrectly transferred to another account या पर्यायावर्ती क्लिक करायचे आहे. आणि आता तिथे दिसणारी सगळी माहीती भरा आणि शेवटी सबमिट करा.
- ही प्रोसेस झाल्यावर सरकार तुमचे पैसे बँकेसोबत मिळून परत करण्याचा प्रयत्न करतात, साधारण 7 दिवसामध्ये तुमचे पैसे तुमच्या अकाउंटमध्ये ट्रान्सफर होतात.
- मित्रांनो तर ही माहिती तुमच्या मित्रांना देखील शेअर करा जेणेकरून त्यांचेही गेलेले पैसे ते परत मिळेल.