नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन आर्टिकल मध्ये . मोटोरोला एक लोकप्रिय मोबाईल उत्पादक कंपनी आहे. आपल्या ग्राहकांसाठी ती नेहमीच नवनवीन स्मार्टफोन घेऊन येत असते ज्यात ग्राहकांना नवनवीन फीचर्स आणि अपडेट देखील नेहमी मिळत असतात. कंपनीने भारतात असाच त्यांचा एक नवीन स्मार्टफोन लॉन्च केला आहे.
मोटोरोला कंपनीने त्यांचा भारतात एक Edge 40 Neo हा नवीन स्मार्टफोन लॉन्च केला आहे. मे महिन्यात लॉन्च झालेल्या त्यांच्या Edge 40 या स्मार्टफोन नंतरचा हा एक नवीन दुसरा स्मार्टफोन आहे . Moto Edge 40 Neo हा एक परवडणारा फोन. असल्याचं सांगितलं जात आहे. या लाँच झालेल्या नवीन स्मार्टफोन बद्दल बद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊया.

Moto Edge 40 Neo Smartphone फीचर्स
मित्रांनो मोटरोलाच्या Moto Edge 40 Neo या स्मार्टफोनमध्ये तुम्हाला 6.5 इंचाचा pOLED डिस्प्ले मिळणार आहे. तसेच या डिस्प्लेचा रिफ्रेश रेट हा 144 Hz एवढा असणार आहे. तसेच डिस्प्ले चा सॅम्पलिंग रेट देखील ३६० Hz एवढा असणार आहे. हा डिस्प्ले कर्व असून त्याचा पीक ब्राईटनेस 1300 नीटस एवढा आहे . MoTO च्या या नवीन स्मार्टफोनमध्ये तुम्हाला मीडियाटेक डायमेनसिटी 7030 प्रोसेसरचा सपोर्ट देखील देण्यात आला आहे. या चिप्स सेट सह लॉन्च होणारा हा स्मार्टफोन आहे. हा स्मार्टफोन तुम्हाला तीन रंगांमध्ये उपलब्ध असणार आहे .त्यामध्ये Caneel Bay , Black Beauty आणि Soothing Sea या तीन रंगात हा फोन तुम्हाला उपलब्ध असणार आहे.
मोटोरोला चा हा स्मार्टफोन तुम्हाला 8/128 जीबी आणि 12 /256 जीबी स्टोरेज स्टोरेज कंपनीने लॉन्च केला आहे .Moto Edge 40 Neo कॅमेरा बद्दल सांगायचे झाले तर यामध्ये तुम्हाला OIS सह 50 MP चा कॅमेरा देण्यात येणार आहे . तसेच त्यात 13 मेगापिक्सल चा अल्ट्राव्हाइड अँगल लेंस देखील देण्यात आला आहे. व्हिडिओ आणि सेल्फी साठी त्यात 32 MP चा कॅमेरा देण्यात आला आहे. या फोनला 68 W चार्जिंग सपोर्ट 5000 mAh क्षमतेची बॅटरी देखील देण्यात आली आहे .मित्रांनो हा फोन केवळ पंधरा मिनिटात 50 टक्के चार्ज होणार आहे असा दावा कंपनीने केला आहे .या फोनमध्ये IP68,5G , यूएसबी टाइप, सी पोर्ट, ड्युअल स्टिरीओ स्पीकर्स, डॉल्बी ॲटमॉस, NFC आणि इन डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर विविध प्रकारचे फीचर्स या मोटोरोलाच्या नवीन Moto Edge 40 Neo या फोनमध्ये देण्यात आले आहे.
Moto Edge 40 Neo किंमत आणि ऑफर्स
* Moto Edge 40 Neo हा फोन 8/ 128 जीबी स्टोरेज असलेल्या फोनची किंमत तुम्हाला 23,999 रुपये एवढी असणार आहे.
* 12 /256 जीबी स्टोरेज असणाऱ्या फोनची किंमत तुम्हाला 25 ,999 रुपये एवढी आहे.
मोटोरोलाच्या नवीन स्मार्टफोनची विक्री येत्या 28 सप्टेंबर पासून फ्लिपकार्ट आणि Motorola .in या रिटेल स्टोअर वर संध्याकाळी सात वाजल्यापासून सुरू होणार आहे. तसेच यावर तुम्हाला एक हजाराचा एक्सचेंज बोनस किंवा बँक ऑफर्स देखील उपलब्ध असणार आहे.
मित्रांनो या आर्टिकल मध्ये दिलेली माहिती तुम्हाला कशी वाटली ते नक्की सांगा आणि अशाच माहितीसाठी आपल्या Tec Marathi ला फॉलो नक्की करत रहा.