- युट्युबच्या माध्यमातून कमाई कशी होते?
- यामध्ये कोणते कन्टेन्ट येतात?
- चॅनेल ची सुरुवात कशी करावी?
नमस्कार मित्रांनो youtube च्या माध्यमातून सध्या अनेक लोक सोशल मीडियावर लाखो रुपये कमवत आहे परंतु हा पैसा कसा कमावला जातो याबद्दल अनेकांना अजूनही माहिती नाहीये तर आज आपण या आर्टिकल मध्ये तेच पाहणार आहोत सोबतच मी तुम्हाला काही चॅनल्स आयडिया देखील देणार आहे ज्याच्या मदतीने तुम्ही तुमचा चेहरा न दाखवता आहे युट्युब वरून पैसे कमवू शकता!
युट्युबच्या माध्यमातून कमाई कशी होते?
युट्युब हा असा प्लॅटफॉर्म आहे ज्यावर तुम्ही तुमचे स्वतःचे व्हिडिओ टाकू शकता हे व्हिडिओ कोणत्याही प्रकारचे असू शकतात तुम्हाला कुठला छंद असेल तर ते त्याच्या संबंधित असू शकतात तुम्हाला काही गोष्टी करायला आवडत असतील तर ते त्याच्याशी संबंधित असू शकतात तुम्ही तुमच्या छंदापासून ते लोकांना शिकवण्यापर्यंत असे वेगवेगळे व्हिडिओ युट्युब या प्लॅटफॉर्मवर अपलोड करू शकता,
Youtube वर व्हिडिओ अपलोड करणं हे अगदी फ्री आहे त्यासाठी तुम्हाला तुमचं स्वतःचं youtube चॅनल बनवावा लागेल यूट्यूब चैनल कसं बनवायचं हे तुम्हाला माहीत नसेल तर खाली दिलेला आपला व्हिडिओ तुम्ही बघू शकता.
एकदा का आपल यूट्यूब चैनल बनलं की त्यानंतर तुम्हाला व्हिडिओज अपलोड करावे लागतात तुमच्या व्हिडिओज ला लोकांनी बघितलं की तुमचे व्ह्यूज काउंट केले जातात काही ठराविक व्ह्यूज आणि 1000 सबस्क्रायबर पूर्ण झालेत की त्यानंतर तुमचं चॅनल हे पैसे कमवण्यासाठी म्हणजे युट्युब पार्टनर प्रोग्राम मध्ये एक्सेप्ट केलं जातं आणि त्यानंतरच तुमची कमाई सुरू होते आता तुम्हाला जेवढे जास्त व्ह्यूज येतील तेवढे जास्त पैसे युट्युब कडून दिले जातात.
उदाहरणार्थ जर तुम्हाला सांगायचं झालं की युट्युब वरून किती पैसे मिळू शकतात तर ते वेगवेगळ्या चॅनलवर डिपेंड असतं जसं जर तुम्ही मोबाईल कम्प्युटर किंवा टेक्नॉलॉजी संबंधित गोष्टी youtube वर सांगत असाल तर या ठिकाणी 1000 लोकांनी व्हिडिओ बघितल्यानंतर त्याला जेमतेम एक डॉलर दिला जातो आता हे पैसे वेगवेगळ्या चॅनल्सला वेगवेगळे दिले जातात. पण ढोबळ मानाने सांगायचं झालं तर किमान पाच ते दहा हजार व्ह्यूजला youtube वर एक डॉलर मिळतो असं तुम्ही गृहीत धरू शकता.
मित्रांनो जर मी तुम्हाला सांगितलं की बिना चेहरा दाखवता आता तुम्ही लाखो रुपये कमवू शकता तर मग तुम्ही म्हणाल की हे कसं शक्य आहे जर चेहरा न दाखवता पैसे कामवता आले असते तर त्या युट्युबर्सने एवढे सेटअप किंवा भारी कॅमेरास कशाला खरेदी केले असते. तर मित्रांनो हे अगदी खरं आहे. जर तुम्हाला तुमचा चेहरा दाखवायचा नाहीय परंतु युट्युबच्या माध्यमातून पैसा कमवायचा आहे तर मी तुमच्यासाठी काही अश्या चॅनेल आयडियास घेऊन आलो आहे ज्यामध्ये तुम्ही तुमचा चेहरा न दाखवता लाखो रुपये कमवू शकणार आहात. तर मी तुम्हाला पुढे Top 5 विदआउट फेस चॅनेल आयडिया सांगणार आहे ते आपण पुढे पाहूयात…
- गेमिंग
मित्रांनो जर तुम्ही गेम खेळण्याचे शौकीन असाल तर तुम्ही युट्युब वर गेम खेळून पैसे कमवू शकता. यामध्ये फेसची अजिबात गरज पडत नाही. यासाठी तुम्हाला युट्युबवर एक चॅनेल बनवावे लागेल आणि तुम्ही जे गेम खेळता त्याची रेकॉर्डिंग करून त्यामध्ये तोड-फार व्हॉइस ओव्हर करून व्हिडिओ उपलोड करायचे आहे. यामध्ये तुम्ही लाईव्ह देखील गेम खेळू शकता. यामध्ये तुम्ही गेम रिव्हिव करणं एखाद्या गेमची ऍडव्हरटाईस करणे यामधून सुद्धा तुम्ही अरनिंग करू शकता.
- हेल्थ चॅनेल
मित्रांनो दुसऱ्या नंबरवर येत ते हेल्थ चॅनेल यासाठी फेसची अजिबात गरज पडत नाही. यामध्ये तुम्ही हेल्थ टिप्स, व्यायाम किंवा हेल्थ आरोग्य संबंधित जे काही आहे ते तुम्ही या चॅनेल वर उपलोड करू शकता. यामध्ये तुम्ही स्पॉन्सर म्हणून सुद्धा काम करू शकता जसे की एखाद्या प्रॉडक्ट ची माहिती सांगणं त्याचे कंटेन्ट सांगणं अशा पद्धतीने तुम्ही अरनिंग करू शकणार आहात.
- सेल्फ डेव्हलपमेंट
यामध्ये तुम्हाला मोटिवेशनल व्हिडिओ बनवावे लागतील ज्यामध्ये तुम्हाला एखादा फोटो स्क्रीनवर घ्यायचा आणि त्याविषयी व्हॉइसओव्हर करायचे. जर तुम्हाला हे काय आहे माहित नसेल तर युट्युबवर सर्च करून पाहू शकता.
- क्वीज व्हिडिओ
मित्रांनो हे कन्टेन्ट लहान मुलांचं खूपच फेव्हरेट असतं. यामध्ये तुम्हाला एखादा प्रश्न विचारायचा असतो जसे की जनरल नॉलेज चे
प्रश्न असतात पण सोप्पे कारण हे कन्टेन्ट लहान मुलांसाठी असणार आहे याला लहान मुलं खूप बघतात. आणि याला सुद्धा फेसची अजिबात गरज नाहीये.
- फॅक्ट व्हिडीओ
यामध्ये तुम्हाला फेस दाखवण्याचे काहीही गरज नाहीये. यात तुम्हाला एखाद्या विषयाशी निगडित पुरेपूर माहिती सांगावी लागते. याबद्दल तुम्ही युट्युब वर fact video असे सर्च करून पाहू शकता.
- स्टोरी टेलिंग
यामध्ये तुम्ही एखाद्या पुस्तकातील स्टोरी वाचून देखील सांगू शकता आणि वेगवेगळे चित्र किंवा ऍनिमेशन देऊन व्हिडीओ बनवू शकता.
तर मित्रांनो हे आहेत काही चॅनलचे प्रकार तर अशा प्रकारचं चॅनल क्रियेट करून त्यावर तशा प्रकारचा कंटेंट म्हणजेच व्हिडिओ अपलोड करून तुम्ही देखील तुमचा चेहरा न दाखवता ही यूट्यूबच्या माध्यमातून पैसे कमवू शकताना. यामध्ये फक्त तुमचं बोलणं सांगण्याची पद्धत आणि त्यासोबतच तुम्ही वापरत असलेले स्टॉक व्हिडिओज चांगले असायला हवेत, म्हणजे लोक तुमचे व्हिडिओज जास्तीत जास्त बघतील त्याला लाईक करतील शेअर करतील आणि त्यामुळे तुमचे सबस्क्राईब देखील वाटतील!
आणि एकदा का तुमचे व्ह्यूज आणि सबस्क्राईब वर वाढायला लागले की त्यानंतर youtube कडून तुम्हाला पैसे देखील मिळायला सुरुवात होईल तेव्हा नक्कीच सुरुवात करा आणि तुमचे काही प्रश्न असतील तर ते कमेंट करून विचारा या व्यतिरिक्त खाली काही व्हिडिओज दिलेले आहेत ते देखील तुम्ही बघू शकता!