PAN Card Reprint: तूमचे पॅन कार्ड हरवलंय? केवळ 50 रुपयांमध्ये घरबसल्या मिळवा नवीन पॅन कार्ड,कसे ते बघाच
PAN Card Reprint: मित्रांनो आता पॅन कार्ड हे खूप महत्त्वाच झाल आहे. सगळीकडेच पॅन कार्ड आता खूप गरजेचे आहे. या ठिकाणी मालमत्ता खरेदी करणे असो किंवा बँक खाते उघडणे, गुंतवणूक करणे इत्यादी सर्वच कामासाठी आता पॅन कार्ड खूप महत्त्वाचं झालं आहे. अशा वेळेस तुमच्याकडे पॅन कार्ड असणं हे खूप गरजेचं असतं .परंतु एखाद्या वेळेस अतिवापरामुळे तुमचा Pan Card हे खराब होतं. त्यामुळे अशा वेळेस जर तुम्हाला नवीन पॅन कार्ड हवे असेल तर ते कसं मिळवायचं हे जाणून घेऊया.
यासाठी तुम्हाला खालील काही सोप्या स्टेप फॉलो करून काही फी भरावी लागेल आणि तुमचं पॅन कार्ड घरी पोहोचेल

किती फी भरावी लागणार?
अनेक वेळा तुम्हाला तुमच्या येथील स्थानिक दुकानदार हे दुसरे Pan Card काढून देण्यासाठी भरपूर पैशाची मागणी करत असता परंतु तुम्ही NSDL च्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊन फक्त 50 रुपयांमध्ये नवीन पॅन कार्ड पुन्हा प्रिंट करू शकता तुम्हाला नवीन पॅन कार्ड घ्यायची असेल तर ते कसे मिळवायचे ते आता आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत.
डुप्लिकेट पॅन कार्ड कसे काढायचे?
1) मित्रांनो यासाठी तुम्हाला सर्वात अगोदर Google वर जाऊन Reprint pan card असे सर्च करावे लागणार आहे.
2)त्यानंतर तुम्हाला NSDL च्या अधिकृत वेबसाईटवर पॅन कार्ड Reprint करण्याचा पर्याय दिसेल त्यावरती क्लिक करावे लागेल.
3) यानंतर तुम्ही तेथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला पॅन कार्ड क्रमांक आणि आधार क्रमांक, जन्मतारीख आणि Captcha code भरावा लागेल आणि पॅन कार्ड चे तपशील प्रविष्ट करावा लागेल.
4)यानंतर तुम्हाला तेथील नियम आणि अटी स्वीकारून ते सबमिट करावे लागेल.
5) यानंतर आता तुमच्यासमोर एक नवीन पेज उघडेल ज्यावरती तुमच्या पॅन कार्ड शी संबंधित सर्व माहितीही रेकॉर्ड केली जाईल.
6)यानंतर तुम्हाला Request OTP वरती क्लिक करायचा आहे.
7)त्यानंतर तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबर वरती तुम्हाला एक OTP येईल तो त्या ठिकाणी टाकायचा आहे.
8)यानंतर त्याचे प्रमाणीकरण करून घ्यावे लागेल.
9)यानंतर तुम्हाला पॅन कार्ड मिळवण्यासाठी तुम्हाला फक्त 50 रुपये शुल्क भरावे लागेल.
10)या ठिकाणी तुम्ही पन्नास रुपये फी भरण्यासाठी नेट बँकिंग चा किंवा UPI चा देखिल वापर करू शकता.
11)यानंतर तुम्ही पेमेंट केल्यानंतर तुमचे डुप्लिकेट पॅन कार्ड हे 7 दिवसाच्या आत तुम्हाला मिळून जाईल.
मित्रांनो वर दिलेली माहिती तुम्हाला कशी वाटली ते नक्की सांगा आणि अशाच माहितीसाठी आपल्या टेक मराठीला फॉलो नक्की करा