Realme Narzo 50i Prime : जर तुम्ही देखील एक बजेट स्मार्टफोन घेण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी ही एक आनंदाची बातमी आहे. तुमच्यासाठी खास Realme च्या बजेट फोनवरही मोठी डील सुरू आहे. आता तुम्ही Realme चा Realme Narzo 50i Prime हा उत्कृष्ठ स्मार्टफोन फक्त Rs 6599 मध्ये खरेदी करू शकता, चला तर मग या स्मार्टफोन बद्दल सविस्तर अशी माहिती जाणून घेऊया.

Amazon सेलमध्ये, Realme Narzo 50i Prime हा स्मार्टफोन चा 4GB RAM आणि 64GB स्टोरेज वेरिएंट 9,999 रुपयांऐवजी फक्त 6,599 रुपयांना लिस्ट केले गेले आहे. या फोनवर ग्राहकांना 34 टक्के एवढी सूट देखील मिळत आहे. तसेच या डिस्काउंटशिवाय ग्राहकांना या फोनवर एक्सचेंज ऑफर देखील देण्यात आली आहे. तुम्ही तुमचा जुना फोन एक्सचेंज करून 6,250 रुपयांपर्यंत सूट देखील मिळवू शकता. त्यासाठी तुमचा स्मार्टफोन चांगल्या स्थितीत असणे आवश्यक आहे.
हा स्मार्टफोन तुम्हाला दोन रंगांच्या पर्यायांमध्ये उपलब्ध आहे ज्यात गडद निळा आणि मिंट हिरवा हे कलर मिळता. फोनच्या वैशिष्ट्यांबद्दल तुम्हाला सांगायचे झाल्यास, यात तुम्हाला 6.5-इंचाचा HD+ LCD डिस्प्ले देण्यात आला आहे. Realme च्या या स्मार्टफोनमध्ये Unisoc T612 प्रोसेसर असून 4GB पर्यंत रॅम देण्यात आली आहे. फोटोग्राफीसाठी त्याच्या मागील बाजूस 8MP कॅमेरा देण्यात आला आहे. त्याच वेळी, सेल्फीसाठी फोनच्या पुढील बाजूस 5MP कॅमेरा देण्यात आला आहे. Realme Narzo 50i Prime या स्मार्टफोन मध्ये तुम्हाला 5000mAh बॅटरी देण्यात आली आहे आणि 10W जलद चार्जिंगसाठी समर्थन देखील येथे उपलब्ध आहे. हा फोन Realme UI Go Edition वर चालतो. अशा पद्धतीने तुमच्यासाठी रियल मी चा हा एक बजेट स्मार्टफोन ठरतो.
तर मित्रांनो अशाच उपयोगी माहितीसाठी आपल्या टेक मराठीला फॉलो नक्की करा.