नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र सरकारने आता एक नवीन पोस्ट काढलेली आहे योजना दुत असं या पदाच नाव असून यासाठी पन्नास हजार जागांची मेगा भरती निघालेली आहे..
त्यामूळे हे योजना दुत पद नक्की काय आहे, पात्रता काय असेल, पगार किती मिळेल याबद्दलची डिटेल माहिती आपण या आर्टिकल मध्ये दिलेली आहे त्यामुळे आर्टिकल पूर्ण वाचा…
• शासन निर्णय:-
आता शासन निर्णय काय सांगतो ते पाहूया तर महाराष्ट्र शासनाच्या विविध योजनांचा प्रचार, प्रसिध्दी करणे व त्यांचा जास्तीत जास्त नागरिकांना लाभ मिळण्याच्या दृष्टीने त्यांना सहाय्य करण्यासाठी ५०,००० योजनादूत निवडण्यासाठी सन २०२४-२५ या आर्थिक वर्षापासून “मुख्यमंत्री योजनादूत कार्यक्रम” सुरु करण्यास या शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात येत आहे.
• आता नक्की योजनदुत काय आहे, कसे निवडले जातील आणि पगार किती असेल?
१) महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालय आणि मुख्यमंत्री जन-कल्याण कक्ष यांच्यामार्फत संयुक्तपणे “मुख्यमंत्री योजनादूत” कार्यक्रम राबविला जाणार आहे. राज्यात कार्यरत प्रशासकीय यंत्रणेला मदत करण्याकरिता मुख्यमंत्री योजनादूत नेमले जातील.
२) ग्रामीण भागात प्रत्येक ग्रामपंचायतीसाठी १ व शहरी भागात ५००० हजार लोकसंख्येसाठी १ योजनादूत या प्रमाणात एकूण ५० हजार योजनादूतांची निवड करण्यात येईल.
३) मुख्यमंत्री योजनादूतास प्रत्येकी १०,००० प्रती महिना एवढे ठोक मानधन देण्यात येईल. (प्रवास खर्च, सर्व भत्ते समावेशित)
• शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादा
१) वयोमर्यादा १८ ते ३५ वयोगटातील उमेदवार.
२) शैक्षणिक अर्हता- कोणत्याही शाखेचा किमान पदवीधर.
३) संगणक ज्ञान आवश्यक
• अर्जासाठी लागणारी कागदपत्रे
१) मुख्यमंत्री योजनादूत” कार्यक्रमासाठी केलेला ऑनलाईन अर्ज.
२) आधारकार्ड.
३) पदवी उत्तीर्ण असल्याबाबतची पुराव्यादाखल कागदपत्रे / प्रमाणपत्र (Certificate)
४) अधिवासाचा दाखला. (सक्षम यंत्रणेने दिलेला)
५) वैयक्तिक बँक खात्याचा तपशिल.
६) पासपोर्ट साईज फोटो.
७) हमीपत्र. (ऑनलाईन अर्जासोबतच्या नमुन्यामधील)
• शासन निर्णय (GR) : PDF Download
निवड झालेल्या मुख्यमंत्री योजनादूतासोबत ६ महिन्यांचा करार केला जाईल व हा करार कोणत्याही परिस्थितीत वाढविण्यात येणार नाही. (लक्षात ठेवा फक्त सहा महिने हा जॉब असणार आहे) असे GR मध्ये सांगण्यात आलेले आहे
• टीप : याच्या ऑनलाईन अर्ज ला अजून सुरुवात झालेली नाही, त्यामुळे जेव्हाही याचे ऑनलाईन अर्ज सुरू होतील तशी अपडेट आपल्या इंस्टाग्राम पेज आणि या वेबसाईटला देण्यात येईल…