जर तुम्ही विद्यार्थी असाल आणि शिक्षणासाठी आर्थिक मदतीची गरज असेल, तर Tata Capital Pankh Scholarship ही तुमच्यासाठी एक उत्तम संधी आहे. या स्कॉलरशिप अंतर्गत विद्यार्थ्यांना ₹10,000 ते ₹1,00,000 पर्यंतची आर्थिक मदत पूर्णपणे मोफत दिली जाते.
महत्त्वाची बाब म्हणजे या स्कॉलरशिपसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 जानेवारी आहे. त्यामुळे पात्र विद्यार्थीांनी वेळ न दवडता अर्ज करणे आवश्यक आहे.
Tata Capital Pankh Scholarship म्हणजे काय?
Tata Capital Limited कडून राबवली जाणारी ही एक शैक्षणिक मदत योजना असून, आर्थिकदृष्ट्या दुर्बल पण गुणवंत विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण पूर्ण करता यावे, हा यामागचा मुख्य उद्देश आहे.
• स्कॉलरशिपची रक्कम
विद्यार्थ्यांच्या शिक्षणाच्या स्तरानुसार स्कॉलरशिपची रक्कम ठरवली जाते:
इयत्ता 6वी ते 10वी : ₹10,000 ते ₹15,000 इयत्ता 11वी ते 12वी : ₹12,000 ते ₹18,000 पदवी (Graduation) : ₹20,000 ते ₹50,000 पदव्युत्तर / प्रोफेशनल कोर्स : ₹1,00,000 पर्यंत
⚠️ अंतिम रक्कम विद्यार्थ्याच्या पात्रतेनुसार व कागदपत्रांनुसार ठरते.
• पात्रता (Eligibility Criteria)
विद्यार्थी भारताचा नागरिक असावा सध्या शाळा / कॉलेज / प्रोफेशनल कोर्समध्ये शिक्षण घेत असणे आवश्यक मागील परीक्षेत किमान 60% गुण कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ठराविक मर्यादेत असावे (साधारणतः ₹2.5 लाख ते ₹4 लाख)
• अर्जासाठी लागणारी कागदपत्रे
अर्ज करताना खालील कागदपत्रांची गरज लागते:
आधार कार्ड
उत्पन्न प्रमाणपत्र
मागील वर्षाची मार्कशीट
बोनाफाइड / अॅडमिशन लेटर
बँक पासबुक
पासपोर्ट साईज फोटो
मोबाईल नंबर व ई-मेल आयडी
• अर्ज कसा करायचा? (How to Apply)
अधिकृत स्कॉलरशिप पोर्टलवर जा Tata Capital Pankh Scholarship निवडा नवीन अर्जदार असल्यास Register करा अर्ज फॉर्म काळजीपूर्वक भरा सर्व आवश्यक कागदपत्रे अपलोड करा फॉर्म Submit करा आणि Confirmation जतन करा
• ऑनलाईन अर्जाची लिंक – Apply
• अर्जाची शेवटची तारीख – 11 जानेवारी 2025
शेवटच्या तारखेची वाट न पाहता आजच अर्ज करा.
• महत्त्वाची सूचना
अर्ज पूर्णपणे मोफत आहे कोणालाही पैसे देऊ नका चुकीची माहिती दिल्यास अर्ज रद्द होऊ शकतो












