Redmi New phone: Xiaomi त्यांच्या बजेट फोनसाठी नेहमीच लोकप्रिय आहे आणि कंपनीने पुन्हा एकदा असाच एक नवीन बजेट फोन लॉन्च केला आहे. यावेळी कंपनीने Redmi 13 C हा फोन ऑफर केला आहे . हा फोन मिड नाईट ब्लॅक ,नेव्ही ब्लू, क्लोव्हर ग्रीन , ग्लेशियर व्हाईट कलर मध्ये सादर करण्यात आला आहे.
या फोनची सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या फोनमध्ये तुम्हाला 8GB रॅम आणि 50 मेगापिक्सल चा कॅमेरा देण्यात आला आहे. आणि यामध्ये 5000 mAh ची बॅटरी सुद्धा तुम्हाला देण्यात आली आहे .चला तर या फोनबद्दल सविस्तर अशी माहिती जाणून घेऊया.
Redmi 13C या फोन विषयी तुम्हाला सांगायच झाल्यास या स्मार्टफोन मध्ये तुम्हाला 90 Hz रिफ्रेश रेट सह 6.74 इंचाचा एच डी प्लस डिस्प्ले मिळतो. यात Redmi 12C प्रमाणेच Helio G85 SoC आहे. यात अतिरिक्त 8 GB रॅम एक्सटेंशनसह 8 GB पर्यंत रॅम देखील आहे. हा स्मार्टफोन अँड्रॉइड 13 वर आधारित असून मीयुआय 14 वर सादर करण्यात आला आहे. प्रोसेसिंग साठी या स्मार्टफोनमध्ये तुम्हाला मीडियाटेक हिलिओ जी 85 चीपसेट मिळतो.
या फोनमध्ये तुम्हाला साइड -माउंटेड फिंगरप्रिंट स्कॅनर देण्यात आला आहे. पावर साठी या बजेट फोन मध्ये तुम्हाला 5000 mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. जी 18W चार्जिंग सपोर्ट सह येते .
या स्मार्टफोनच्या किमतीबद्दल सांगायचं झाल्यास, Redmi 13C चे 4GB+128GB मॉडेल USD 109 मध्ये लॉन्च केले आहे, म्हणजे सुमारे 9,090 रूपये. अनेकांना आता हा फोन भारतात कधी लॉन्च होणार याबाबत उत्सुकता आहे . परंतु आपण भारतात कधी लॉन्च होईल याबाबत अजून काहीही सांगण्यात आलेलं नाही.