IQOO 12 5G Smartphone Launch: आयकू या चिनी स्मार्टफोन उत्पादक कंपनीने त्यांचा नुकताच एक नवीन स्मार्टफोन भारतात लॉन्च केला आहे. आणि त्यांनी लॉन्च केलेल्या IQOO 12 5G या स्मार्टफोनमध्ये स्नॅपड्रॅगन 8th जेन 3 चीपसेट देण्यात आला आहे.
तसेच हा लेटेस्ट सॉफ्टवेअर असणारा भारतातील पहिला असा स्मार्टफोन ठरला आहे.IQOO 12 5G हा स्मार्टफोन तुम्हाला दोन स्टोरेज ऑप्शन मध्ये लॉन्च करण्यात आला आहे. यामधील बेस व्हर्जन मध्ये 12 GB रॅम आणि 256 GB चा स्टोरेज देण्यात आला आहे. तर दुसऱ्या व्हर्जन मध्ये तुम्हाला 16 GB रॅम आणि 512 GB स्टोरेज देण्यात आले आहे. यामध्ये तुम्हाला ब्लॅक आणि व्हाईट असे दोन रंग उपलब्ध असणार आहे.
IQOO 12 5G फीचर्स
IQOO 12 5G या स्मार्टफोन मध्ये तुम्हाला 6.78 इंचाचा मोठा असा LTPO AMOLED डिस्प्ले देण्यात आला असून त्याचा रिफ्रेश रेट हा 144 Hz एवढा आहे. तसेच या स्मार्टफोनचा Antutu स्कोअर हा 2 मिलियन पेक्षा जास्त आहे. तसेच या स्मार्टफोनमध्ये तुम्हाला 5000 mAh ची बॅटरी देण्यात आली आहे जी 120 w फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.

या स्मार्टफोन बाबत विशेष बाब सांगायची झाल्यास या फोनमध्ये तुम्हाला सर्वात लेटेस्ट असे Snapdragon 8th Gen 3 चीपसेट देण्यात आला आहे.तसेच या स्मार्टफोन मध्ये तुम्हाला, अँड्रॉइड 14 देखील मिळत आहे.तसेच IQOO 12 5G मध्ये तुम्हाला 64 MP ची टलिफोटो लेन्स देण्यात आली आहे. तसेच या स्मार्टफोनमध्ये तुम्हाला ट्रिपल कॅमेरा सेटअप देण्यात आला असून यामध्ये मुख्य कॅमेरा हा 50 मेगापिक्सल चा आहे. तसेच 50 MP ची अल्ट्रावाइड लेन्स आणि 64 MP ची टेलिफोटो लेन्स तुम्हाला देण्यात आली आहे. तसेच 3X ऑप्टिकल झूम, 10X हायब्रीड झूम आणि 100X डिजिटल झूम देखील देण्यात आला आहे. त्यामुळे या फीचर्स मुळे हा फोन एक उत्कृष्ट असा स्मार्टफोन ठरतो आहे. त्यामुळेच त्याला भारतीय मार्केटमध्ये चांगली पसंती मिळण्याची शक्यता देखील व्यक्त केली जात आहे.
IQOO 12 5G किंमत?
IQOO 12 5G या स्मार्टफोन मध्ये तुम्हाला 12+256 GB या व्हेरिएंट ची किंमत ही 52,999 रुपये एवढी ठेवण्यात आली आहे.तसेच 16+512GB या व व्हेरियंट ची किंमत ही 57,999 रुपये एवढी आहे. तसेच या स्मार्टफोनवर तुम्हाला ICICI आणि HDFC या बँकांच्या डेबिट आणि क्रेडिट कार्डवर 3000 रुपयाची अधिकची सूट देखील मिळू शकते. तसेच तूम्ही IQOO किंवा VIVO फोन जर एक्सचेंज केला तर तुम्हाला पाच हजार रुपयाची अधिकची सूट देखील मिळू शकते.
IQOO 12 5G हा स्मार्टफोन तुम्हाला आजपासून म्हणजेच 14 डिसेंबर पासून विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे.
वर दिलेली माहिती तुम्हाला कशी वाटली ते नक्की सांगा आणि अशाच माहितीसाठी टेक मराठीला फॉलो नक्की करा.