Best Smartphones Under 10k : मित्रांनो जर तुम्ही असा स्मार्टफोन शोधत असाल ज्यात तुम्हाला कमी बजेटमध्ये अप्रतिम फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स पाहायला मिळतील तर ही माहिती तुमच्यासाठी खूप महत्त्वाची ठरेल. आज आम्ही तुम्हाला भारतीय स्मार्टफोन बाजारात उपलब्ध अशा पर्यायांबद्दल सांगणार आहोत ज्यांची किंमत 10,000 रुपयांपेक्षा कमी आहे आणि ते सर्व सर्वोत्तम श्रेणीत येतात. चला तर मग अशा स्मार्टफोनच्या यादीवर एक नजर टाकूया
10,000 हजार खालील सर्वोत्कृष्ट स्मार्टफोन

Poco C51: या स्मार्टफोनची किंमत 6,999 रुपये एवढी आहे. या स्मार्टफोनमध्ये तुम्हाला 4GB रॅम सह 64GB इंटरनल स्टोरेजचा सपोर्ट मिळतो. कामगिरीसाठी कंपनीने या स्मार्टफोनमध्ये MediaTek Helio G36 चिपसेट देखील वापरला आहे. त्याच वेळी, आउट ऑफ द बॉक्स हा स्मार्टफोन Android 13 Go एडिशनसह येतो. एवढेच नाही तर कंपनीने हा स्मार्टफोन 5,000mAh बॅटरीसह लॉन्च केला आहे. जो तुमच्यासाठी कमी बजेटमध्ये एक चांगला स्मार्टफोन ठरतो
Realme Narzo N53: जर तुम्हाला Realme फोन चे चाहते असाल तर Realme Narzo N53 हा स्मार्टफोन चांगला पर्याय ठरू शकतो. या स्मार्टफोनमध्ये तुम्हाला एक मोठा डिस्प्ले मिळेतो जो 90Hz फास्ट रिफ्रेश रेटला देखील सपोर्ट करतो. या स्मार्टफोनमध्ये तुम्ही हेवी टास्किंग करू शकणार नाही, परंतु तुम्ही इतर सर्व कामे सहजपणे करू शकाल. या स्मार्टफोनमध्ये 5000mAh बॅटरी आहे आणि ती 33W फास्ट चार्जिंगलाही सपोर्ट करते. हा स्मार्टफोन देखील तुम्हाला दहा हजार रुपयांच्या एक चांगला पर्याय ठरतो.
Realme C55: या यादीतील Realme चा हा दुसरा स्मार्टफोन आहे. या स्मार्टफोनची किंमत 10,999 रुपये ठेवली आहे, परंतु तुम्ही हा 10,000 रुपयांपेक्षा कमी किंमतीत तुम्ही खरेदी करू शकता. उत्तम परफॉर्मन्ससाठी कंपनीने या स्मार्टफोनमध्ये MediaTek Helio G88 चिपसेट वापरला आहे.
Moto E13: जर तुम्ही एखादा असा स्मार्टफोन च्या शोधात असाल ज्यामध्ये तुम्हाला Android चा स्टॉक अनुभव मिळेल, तर हा स्मार्टफोन तुमच्यासाठी एक चांगला पर्याय ठरू शकतो. या स्मार्टफोनची किंमत फक्त 6,799 रुपये ठेवण्यात आली आहे. तुमच्या माहितीसाठी, या स्मार्टफोन मध्ये तुम्हाला IP52 रेटिंग देखील मिळते.
मित्रांनो वरील सर्व स्मार्टफोन तुम्हाला दहा हजार रुपयांच्या आत मध्ये एक चांगला पर्याय ठरतात. जर तुम्ही दहा हजार रुपयांच्या आत मधील बजेटमध्ये स्मार्टफोन घेण्याचा विचार करत असाल वरीलपैकी कुठलाही एक स्मार्टफोन तुम्ही निवडू शकता जो तुमच्यासाठी एक चांगला पर्याय ठरेल.