लोकप्रिय मेसेजिंग प्लॅटफॉर्म WhatsApp वर, युजर्सना आता एचडी कॉलीटीचा व्हिडिओ शेअर करण्याचा पर्याय मिळाला आहे. याचा अर्थ असा की आता युजर्सना HD कॉलीटीचे व्हिडिओ शेअर करण्यासाठी Google ड्राइव्ह लिंक्स आणि इतर क्लाउड सेवांची मदत घ्यावी लागणार नाही आणि हे त्यांच्या आवडत्या मेसेजिंग अँपवर जाऊन करता येईल. युजर्सच्या मागणीनुसार अँपमध्ये एचडी क्वालिटीमध्ये फोटो शेअर करण्याचा पर्याय आधीच समाविष्ट करण्यात आला आहे.
मेटाच्या मालकीच्या मेसेजिंग अँपने नवीन HD व्हिडिओ शेअरिंग फिचर iOS आणि Android दोन्ही प्लॅटफॉर्मवर आणले आहे. युजर बऱ्याच काळापासून मागणी करत होते की त्यांना एचडी गुणवत्तेत व्हिडिओ शेअर करण्याचा पर्याय देण्यात यावा कारण अँपवर पाठवल्या जाणार्या व्हिडिओंची कॉलिटी कमी होते आणि ते कॉम्प्रेस केले जात होते. या बदलामुळे व्हिडिओंच्या स्पष्टतेवर परिणाम झाला आणि ते यापुढे शार्प आणि क्रिप्स झाले नाहीत.
• Whatsapp वर कसे पाठवावे HD कॉलिटी व्हिडीओज आणि फोटोज
नवीन व्हॉट्सअँप फिचर वापरण्यास अतिशय सोपे आहे आणि युजर फाइल पाठवण्यापूर्वी ती कोणत्या कॉलिटीत पाठवायची ते निवडू शकतात. कोणताही व्हिडिओ किंवा फोटो पाठवताना, सेंड बटणावर टॅप करून, तुम्हाला स्क्रीनच्या वरती असलेल्या ‘HD’ च्या चिन्हावर टॅप करावे लागेल. यानंतर, हा कॉलिटी HD मध्ये बदलण्याचा आणि व्हिडिओ किंवा फोटो कॉलिटी निवडण्याचा पर्याय असेल. बाय डीफॉल्ट, स्टोरेज बचत करण्यासाठी फोटो आणि व्हिडिओ स्टॅण्डर्ड कॉलिटीमध्ये पाठवले जातात.
जर तुम्ही एकाच वेळी अनेक फोटो आणि व्हिडिओ पाठवत असल्यास, अगोदर फोटो किंवा व्हिडिओवरील HD बटण टॅप केल्याने सर्व फायली HD कॉलिटी मध्ये पाठवल्या जातील. युजर्स वैयक्तिक फाइल्ससाठी HD किंवा स्टॅण्डर्ड कॉलिटी यापैकी निवडू शकतात. याशिवाय, एचडी कॉलिटीमध्ये पाठवलेले फोटो आणि व्हिडिओ प्राप्त करणाऱ्या कोणालाही या फाइल्सच्या खाली एचडी लिहिलेले दिसेल. अशा प्रकारे त्यांना समजेल की फोटो आणि व्हिडिओ HD कॉलिटी मध्ये पाठवले गेले आहेत.