IBPS Clerk Recruitment 2025 : भारतातील सरकारी बँकांमध्ये कारकीर्द घडवण्याचे स्वप्न पाहणाऱ्या लाखो उमेदवारांसाठी IBPS Clerk भरती 2025 ही एक सुवर्णसंधी आहे. Institute of Banking Personnel Selection (IBPS) दरवर्षी Clerk पदासाठी मोठ्या प्रमाणात भरती प्रक्रिया राबवते. यंदाच्या भरतीमध्ये एकूण 10,277 पदांसाठी संधी उपलब्ध आहे. ही भरती CRP CLERKS‑XV (Common Recruitment Process) अंतर्गत देशभरातील विविध बँकांमध्ये केली जात आहे.
या लेखात तुम्हाला अर्जाची प्रक्रिया, पात्रता, परीक्षा पद्धत, महत्त्वाच्या तारखा आणि इतर सर्व आवश्यक माहिती मराठीतून समजावून सांगितली आहे. सरकारी बँकेत स्थिर नोकरी मिळवण्याची इच्छा असेल, तर हा लेख नक्की वाचा आणि तुमची तयारी आजपासूनच सुरू करा!
IBPS Clerk Bharti 2025
- एकूण जागा – 10277
- पद – लिपिक
> जागा – 10277
🎓 शैक्षणिक पात्रता (Educational Qualification)
- पदवीधर (Graduate) असणे आवश्यक आहे
उमेदवाराने कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी प्राप्त केलेली असावी.
कोणत्याही शाखेतील (Arts, Commerce, Science, Engineering, etc.) पदवी चालते. - पदवीचे प्रमाणपत्र (Degree Certificate)
अर्ज करताना उमेदवाराकडे पदवीचे मूळ प्रमाणपत्र किंवा अंतिम वर्षाचे मार्कशीट असणे अनिवार्य आहे. - कॉम्प्युटर कौशल्य (Computer Knowledge)
उमेदवाराला कॉम्प्युटर चालवण्याचे मूलभूत ज्ञान असणे आवश्यक आहे.
किमान एक संगणक अभ्यासक्रम (e.g. MS-CIT, DCA) केलेला असावा किंवा शालेय/महाविद्यालयीन अभ्यासक्रमात संगणक विषय शिकलेला असावा.
- वयोमर्यादा – 20 ते 28 वर्षे
(SC/ST साठी 05 वर्षे, OBC साठी 03 वर्षे सूट) - नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत
- ऑनलाईन अर्जाची फी
General/OBC साठी 850 रुपये
SC/ST/PWD/ExSM साठी 175 रुपये
• परीक्षा पद्धती
- Prelims परीक्षा:
English Language – 30 प्रश्न
Numerical Ability – 35 प्रश्न
Reasoning Ability – 35 प्रश्न
⏱ वेळ: 60 मिनिटे - Mains परीक्षा:
General/Financial Awareness – 50 प्रश्न
General English – 40 प्रश्न
Reasoning & Computer Aptitude – 50 प्रश्न
Quantitative Aptitude – 50 प्रश्न
⏱ वेळ: 160 मिनिटे