गेल्या अनेक वर्षांपासून Gmail वापरकर्त्यांना एकच तक्रार होती एकदा बनवलेला Gmail ईमेल आयडी कधीच बदलता येत नव्हता.
पण आता ही अडचण संपणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार Google Gmail वापरकर्त्यांना त्यांचा ईमेल आयडी बदलण्याची सुविधा देणारच आहे. ही अपडेट लवकरच सर्वांसाठी येणार असून, त्याची अधिकृत घोषणा कधीही होऊ शकते.
खरंतर Gmail च्या सपोर्ट पेजवर “Change Gmail address” असा पर्याय दिसू लागलाय. त्यामुळे Google हे फीचर हळू हळू सर्वांसाठी उपलब्ध करणार आहे!
Gmail ID बदलता येणार म्हणजे नेमकं काय होईल?
ही सुविधा आल्यानंतर वापरकर्ते: जुना, अव्यावसायिक किंवा चुकीचा Gmail ID बदलू शकतील कोणताही मेल किंवा डेटा न गमावता Google अकाउंट पूर्णपणे सेफ राहील
विशेष बाब म्हणजे:
जुना आणि नवीन Gmail ID दोन्ही चालू राहतील कोणत्याही ID वर आलेले मेल्स एकाच inbox मध्ये येतील लॉगिनसाठी दोन्ही ID वापरता येतील
म्हणजे Gmail ID बदलल्यानंतरही कोणताही गोंधळ किंवा त्रास होणार नाही.
काही नियम असणार, पण सुविधा मिळणार
हो, काही मर्यादा असतील: Gmail ID एक वर्षात एकदा तर Lifetime फक्त ३ वेळा बदलण्याची परवानगी दिली जाईल, जुना वापरलेला Gmail ID पुन्हा कोणालाही दिला जाणार नाही
कधी मिळेल ही सुविधा?
Google कडून अजून सर्वांसाठी हे ऑप्शन कधी मिळणार आहे याची तारीख जाहीर झालेली नाही, पण लवकरच अधिकृत घोषणा होणार आहे.
ही सुविधा Google च्या My Account Settings मध्येच मिळेल.
त्यासाठी Gmail ओपन करून My Account मधे Manage Your Google Account वर क्लिक करून Personal Info मधे जावे लागेल!
येथे Gmail ID या Option वर क्लिक केल्यानंतर Google Account Email या ठिकाणी हे Option दिसेल!
जर तुम्हाला अजून हे ऑप्शन आलेले नसेल तर चिंता करू नका लवरकच हे ऑप्शन सर्वांना येणार आहे!
याबद्दलचा डीटेल व्हिडिओ आपल्या Indtagram अकाउंट वर पोस्ट केला जाईल 👍













