दररोज येणार्या महत्त्वाच्या कॉलच्या संख्येत समाविष्ट असलेल्या स्पॅम कॉलचा कोणाला त्रास होत नाही. जर तुम्ही देखील अशा लोकांपैकी असाल ज्यांना अनोळखी नंबरवरून येणार्या कॉलमुळे त्रास होत असेल तर तुम्ही त्यांना ब्लॉक करण्याचा सोपा मार्ग वापरून पहा. Truecaller सारख्या थर्ड-पार्टी अँपच्या मदतीशिवायही हे करता येते.
Google ने आपल्या मोबाईल ऑपरेटिंग सिस्टम अँड्रॉइडमध्ये असे कॉल्स बाय-डिफॉल्ट ब्लॉक करण्याचा पर्याय दिला आहे. तथापि, बहुतेक स्मार्टफोन कंपन्या Android OS वर आधारित त्यांचे स्वतःचे सॉफ्टवेअर स्किन प्रदान करतात, त्यामुळे काही वेळा हे फिचर वापरणे सोपे नसते.
- Google च्या मदतीने करा ब्लॉक
तुमच्या स्मार्टफोनमध्ये गुगल फोन अँप इन्स्टॉल केले असल्यास अनोळखी नंबर ब्लॉक करणे सोपे होईल. तुम्हाला खाली दिलेल्या स्टेप फॉलो कराव्या लागेल.
- डिव्हाइसवर Google फोन अँप उघडा.
- डायलर शोध बारच्या पुढे उजवीकडे वरती असलेल्या तीन डॉटवर टॅप करा.
- Settings वर टॅप केल्यानंतर तुम्हाला Blocked numbers चा पर्याय दाखवला जाईल.
- त्यावर टॅप केल्यानंतर, तुम्हाला unknown ऑप्शन इनेबल करावा लागेल.
असे केल्यावर संपर्क यादीमध्ये सेव्ह न केलेले सर्व नंबर तुमच्या डिव्हाइससाठी ब्लॉक केले जातील.
- Samsung युजर असे करा ब्लॉक
- तुमच्या Samsung डिव्हाइसवर फोन अँप उघडा.
- आता थ्री-डॉट मेनूवर टॅप करून सेटिंग्जवर जा.
- येथे तुम्हाला ब्लॉक नंबर्स पर्यायावर टॅप करावे लागेल.
- शेवटी unknown / hidden नंबर ब्लॉक करा यावर टॅप करा, जेणेकरून तुम्ही अनोळखी नंबरवरून येणारे कॉल ब्लॉक करू शकता.
- Xiaomi युजर खालील स्टेप्स करा.
- प्रथम Xiaomi च्या Android डिव्हाइसमध्ये फोन अँप उघडा.
- येथे सर्च बारच्या वर दिसणार्या तीन डॉटसह मेनूवर टॅप करा.
- स्क्रीनवर दिसणार्या मेनूमधून तुम्हाला सेटिंग्ज निवडावी लागतील.
- येथे Unknow वर टॅप केल्यानंतर, तुम्हाला अनोळखी नंबरवरून येणारे कॉल ब्लॉक करण्याचा पर्याय मिळेल.