लोकप्रिय सोशल मीडिया साइट फेसबुकवर, वापरकर्त्यांना खाते हटविण्याचा आणि निष्क्रिय करण्याचा पर्याय मिळतो. फेसबुक खाते हटवणे आणि निष्क्रिय करणे यातील फरक म्हणजे तुम्ही तुमचे खाते निष्क्रिय केल्यास, तुम्ही तुमचे खाते पुन्हा सक्रिय करू शकता. दुसरीकडे, जर तुम्ही तुमचे खाते एकदा डिलीट केले, तर तुमच्या पोस्ट, फोटो, व्हिडिओ आणि कमेंट्स तुमच्या खात्यासह Facebook वरून कायमच्या काढून टाकल्या जातात.
जर तुम्ही फेसबुकवरील ऑनलाईन प्रायव्हसीला घेऊन चिंतेत असाल किंवा तुम्ही सोशल मीडिया पासून दूर राहू इच्छिता तर तुम्ही फेसबुकवरील तुमचे अकाउंट डीऍक्टिव्हेट किंवा डिलीट करू शकता. येथे आम्ही तुम्हाला फेसबुक अकाउंट डीऍक्टिव्हेट आणि डिलिट करण्याबाबत सर्व माहिती देणार आहोत. त्यासाठी पुढील काही स्टेप्स फॉलो करा.
- फेसबुक अकाउंट डिलीट कसे करायचे
Step 1 : सर्वात अगोदर तुम्हाला तुमचे फेसबुक अकाउंट ओपन करायचे आहे.
Step 2 : त्यानंतर तुम्हाला सेटिंग आणि प्रायव्हसीवर जायचे आहे, येथे तुम्हाला सेटिंग आणि आणि सेक्युरिटी वरती क्लिक करायचे आहे.
Step 3 : आता तुम्हाला प्रायव्हसी वरती क्लिक करायचे आहे आणि येथे फेसबुक इन्फॉमेशन वरती क्लिक करायचे आहे.
Step 4 : येथे तुम्हाला सर्वात शेवटी Deactivate and Deletion चा पर्याय दिसेल त्यापैकी तुम्हाला एक पर्याय निवडायचा आहे.
Step 5 : त्यानंतर जर तुम्ही Deactivate ऑपशन वरती क्लिक केले असेल तर तुमचे अकाउंट भविष्यात कधीही ओपन होईल. आणि जर तुम्ही Deletion वरती क्लिक केले तर ते अकाउंट तुम्ही कधीही उघडू शकणार नाही.
- नोंद घ्या : मित्रांनो आम्ही तुम्हाला आधीच कळवले आहे की तुमचे खाते निष्क्रिय केल्यानंतर तुम्ही भविष्यात तुमचे खाते सक्रिय करू शकता. एकदा तुम्ही Facebook खाते हटवल्यानंतर, तुम्ही भविष्यात पुन्हा Facebook खाते सक्रिय करू शकणार नाही, तुम्हाला नवीन खाते तयार करावे लागेल. यासोबतच तुमचा फेसबुकवरील पोस्ट, फोटो आणि व्हिडिओ यांसारखा डेटाही हटवला जाईल.
मित्रांनो माहिती आवडली असल्यास लाईक करा शेअर करा आणि अशाच इतर टेक्निकल माहितीसाठी आपल्या Tech Marathi – टेक मराठी फेसबुक पेजला फॉलो करा आणि जर तुम्हाला टेक्निकल व्हिडिओ डिटेल्स मध्ये पाहायचे असतील तर Tech Marathi युट्युब चॅनेल ला फॉलो नक्की करा.
धन्यवाद.. 🙏