Post Office GDS Bharti 2026: भारतीय डाक विभागामध्ये नोकरी करू इच्छिणाऱ्या 10वी पास उमेदवारांसाठी मोठी संधी आहे. India Post ने Gramin Dak Sevak (GDS) Online Engagement Schedule-II, July 2026 ची प्रक्रिया जाहीर केली आहे.
या भरतीमध्ये Branch Postmaster (BPM), Assistant Branch Postmaster (ABPM) आणि Dak Sevak या पदांसाठी उमेदवारांची निवड केली जाणार आहे.
सर्वात महत्त्वाचे म्हणजे या भरतीसाठी लेखी परीक्षा किंवा मुलाखत घेतली जात नाही. उमेदवारांची निवड 10वीच्या गुणांवर आधारित तयार होणाऱ्या Merit List द्वारे केली जाते.
Post Office GDS Bharti 2026 – थोडक्यात
- पदाचे नाव: BPM, ABPM, Dak Sevak
- शैक्षणिक पात्रता: 10वी पास
- वय: 18 ते 40 वर्षे
- निवड प्रक्रिया: 10वीच्या गुणांवर आधारित Merit
- परीक्षा: नाही
- अर्ज पद्धत: Online
- Registration: 31 ऑगस्ट ते 19 सप्टेंबर 2026
- Application: 2 सप्टेंबर ते 21 सप्टेंबर 2026
- Correction: 23 ते 24 सप्टेंबर 2026
या तारखा India Post च्या अधिकृत GDS पोर्टलवर जाहीर करण्यात आल्या आहेत.
शैक्षणिक पात्रता
GDS भरतीसाठी उमेदवार 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. 10वीमध्ये Mathematics आणि English विषय असणे तसेच संबंधित Post Office Circle ची स्थानिक भाषा 10वीपर्यंत शिकलेली असणे आवश्यक आहे.
याशिवाय basic computer knowledge आणि सायकल चालवता येणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा
उमेदवाराचे वय 18 ते 40 वर्षे असावे. SC, ST, OBC, EWS, PwBD इत्यादी पात्र उमेदवारांना सरकारी नियमांनुसार वयामध्ये सवलत मिळते.
GDS चा पगार किती?
GDS पदांवर TRCA पद्धतीने remuneration दिले जाते.
- BPM: ₹12,000 ते ₹29,380
- ABPM / Dak Sevak: ₹10,000 ते ₹24,470
GDS हे नियमित Central Government employee पदापेक्षा वेगळे आहे आणि त्याच्या सेवा अटी GDS Rules नुसार असतात.
Selection कस होणार?
GDS भरतीमध्ये लेखी परीक्षा नाही.
10वीच्या गुणांवर आधारित system-generated Merit List तयार केली जाते. त्यानंतर Merit List मध्ये shortlisted झालेल्या उमेदवारांची Document Verification केली जाते.
म्हणजेच:
10वीचे Marks → Merit List → Document Verification → Selection
• किती Marks असतील तर Selection होऊ शकते?
हा सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे.
GDS भरतीसाठी कोणतेही fixed minimum percentage सांगता येत नाही. Selection हे तुमचे 10वीचे marks, category, division आणि त्या ठिकाणी उपलब्ध असलेल्या vacancies यावर अवलंबून असते.
मागील महाराष्ट्रातील cutoff चा अंदाज पाहिला तर अनेक ठिकाणी 90% च्या आसपास किंवा त्यापेक्षा जास्त marks असलेल्या उमेदवारांना merit मध्ये संधी मिळालेली दिसते.
उदाहरणार्थ, 2025 च्या महाराष्ट्रातील उपलब्ध cutoff data नुसार:
- Nashik Division – UR: सुमारे 89%
- Pune City – UR: सुमारे 90%+
- Mumbai City – UR: साधारण 87% ते 91% दरम्यान division नुसार फरक
- काही divisions मध्ये UR cutoff 92–95%+ देखील गेला.
म्हणून 90% marks असतील तर chance चांगला असू शकतो, पण selection निश्चित आहे असे म्हणता येत नाही. 95% किंवा त्यापेक्षा जास्त marks असल्यास मागील cutoff च्या तुलनेत अनेक ठिकाणी chance मजबूत मानता येतो. Reserved category मध्ये cutoff तुलनेने कमी असू शकतो. मागील cutoff हा फक्त अंदाजासाठी आहे; 2026 चा actual cutoff vacancies आणि competition नुसार बदलणार आहे.
GDS अर्जासाठी आवश्यक कागदपत्रे
अर्ज करताना खालील कागदपत्रे जवळ ठेवावीत:
- 10वीची Marksheet
- आधार कार्ड / ओळखपत्र
- पासपोर्ट फोटो
- Signature
- Mobile Number
- Email ID
- Caste Certificate, लागू असल्यास
- EWS / PwBD Certificate, लागू असल्यास
अर्जामध्ये 10वीचे marks Marksheet प्रमाणेच भरणे अत्यंत महत्त्वाचे आहे. चुकीची माहिती आढळल्यास candidature रद्द होऊ शकते.
GDS Bharti 2026 अर्ज कसा करायचा?
- India Post च्या अधिकृत GDS portal वर जा.
- One-Time Registration पूर्ण करा.
- Registration Number मिळवा.
- Application Form मध्ये वैयक्तिक व शैक्षणिक माहिती भरा.
- 10वीचे marks Marksheet प्रमाणे भरा.
- आवश्यक documents/details पूर्ण करा.
- लागू असल्यास application fee भरा.
- Form Final Submit करून त्याची copy जतन करा.
उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी आपली eligibility आणि post/division preference काळजीपूर्वक तपासणे आवश्यक आहे.
महत्त्वाच्या तारखा आणि लिंक्स
Registration: 31 ऑगस्ट ते 19 सप्टेंबर 2026
Online Application: 2 सप्टेंबर ते 21 सप्टेंबर 2026
Correction Window: 23 ते 24 सप्टेंबर 2026
अर्जाची अंतिम वेळ सायंकाळी 5 वाजेपर्यंत आहे.
• ऑनलाइन अर्जाची लिंक – Apply
• जाहिरात PDF- Download
निष्कर्ष
Post Office GDS Bharti 2026 ही 10वी पास उमेदवारांसाठी चांगली संधी आहे. विशेष म्हणजे या भरतीमध्ये लेखी परीक्षा नसून 10वीच्या marks वर Merit List तयार केली जाते.
जर तुमचे 90%+ marks असतील तर मागील महाराष्ट्रातील cutoff पाहता selection ची चांगली शक्यता असू शकते. 95%+ marks असल्यास chance आणखी मजबूत मानता येतो. मात्र कोणत्याही उमेदवाराचे selection आधीच निश्चित सांगता येत नाही, कारण अंतिम merit ही category, division, vacancies आणि उमेदवारांच्या marks वर अवलंबून असते.
अधिकृत माहिती आणि अर्जासाठी: India Post च्या GDS Online Engagement portal वरच माहिती तपासा.











